Basic Information :
Rajendrasinh RajeBhosale
Rajendrasinh shankarrao RajeBhosale
Wednesday, May 6, 1953
vikramrajebhosale@rediffmail.com
9422068506
Karmala
समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात येऊनही आपले सामाजिक भान जपणारे व्यतिमत्व म्हणजेच राजेंद्रसिंह राजेभोसले होय. 1980 च्या दशकात प्रतिकुल परीस्थित उच्च पदवीधर होऊनही त्यांनी नौकरी न करता दुग्धव्यवसायाचा माध्यमातून परिसराच्या विकासाचा ध्यास घेतला. भैरवनाथ सहकारी दूध संस्था, वसंतदादा पाटील ग्रामीण बिगर शेती पतसंस्था या माध्यमातून आपले कार्य सुरू केले. 1979 ला ते विरोधी गटातून पंचायत समितीला निवडून आले. याच कालावधीत पंचक्रोशीतील युवकांना संगठीत करून शेकडो दूध संस्था करमाळा तालुक्यात उभारल्या. ज्या तालुक्यात काही लिटर दुध उत्पादन होत होते त्या तालुक्यात आज लाखो लिटर दररोजचे दूध उत्पादन होत आहे, आणि याचे श्रेय निर्विवादपणे राजेंद्रसिंह राजेभोसले यांना जाते. 1993 पासून सलग आत्तापर्यंत सोलापूर जिल्हा दुध संघावर निवडून जाण्याचा विक्रमही त्यांनी नोंदवीला आहे.
पूर्णवेळ राजकारणात असूनही आपली साहित्याची आवड त्यांनी जोपासली आहे. अगदी अलीकडे प्रकाशित झालेली पुस्तकेही त्यांनी वाचलेली असतात. घरातच त्यांनी सुसज्ज ग्रंथालय उभारले आहे. आजवर त्यांनी चीन, जर्मनी, इस्रायल, मलेशिया, इजिप्त, सिंगापूर, थायलंड, नेपाळ देशांचा अभ्यास दौरे केले आहेत.
Please Add Description


