Shankarrao Bhaurao Yeole

Shankarrao Bhaurao Yeole
Monday, September 12, 1927
shankarraoyeole27@gmail.com
Not Available
Karmala
शंकरराव भाऊराव येवले (१२ सप्टेंबर १९२७ - २४ जून २०१२) हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एक स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार होते. त्यांनी १९४२ च्या चलेजाव चळवळीत आणि १९४६-१९४८ च्या हैद्राबाद/मराठवाडा मुक्ती संग्रामात भाग घेतला होता. ते सोलापूर जिल्हा भूमिगत स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष होते. त्यांनी दैनिक नवशक्ती, दैनिक नवाकाळ, दैनिक मराठा, दैनिक तरुण भारत, दैनिक संचार या वृत्तपत्रांमध्ये ६० वर्षांहून अधिक काळ पत्रकार म्हणून काम केले होते. ते साप्ताहिक सल्लाचे संस्थापक/संपादक होते. (करमाळा तालुक्यातील पहिले वृत्तपत्र) आणि ते सोलापूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्षही होते. त्यांनी लिहिलेली 'सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढा' आणि करमाळ्याचे श्री कमलाभवानी मंदिर व करमाळा परिसराच्या इतिहासावर आधारित 'जय अंबे कमलाभवानी' ही दोन पुस्तके अनुक्रमे १९९४ आणि १९९५ मध्ये प्रकाशित झाली होती. शंकरराव येवले यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

• शंकरराव येवलेंना महाराष्ट्र शासनाकडून तसेच विविध सामाजिक संस्था-संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते त्यापैकी काही पुरस्कार -

* भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल करमाळा नगर परिषदेचा 'नगरभूषण' पुरस्कार. (सन १९७०)

* बिहार सरकारच्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या नियोजित विधेयकाविरुद्ध सोलापूर येथील सत्याग्रहात सक्रिय भाग घेतल्याबद्दल सोलापूर जिल्हा पत्रकार संघाचे 'गौरव पत्र.' (सन १९८४)

* पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या प्रदीर्घ जनसेवेबद्दल आणि पत्रकारितेतील ४० वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीबद्दल करमाळा नगर परिषदेचा 'आदर्श पत्रकार' पुरस्कार. (सन १९८७)

* रोपळे, माढा येथील कै. पां. ना. तथा राजाभाऊ कुलकर्णी (रोपळेकर) प्रतिष्ठानचा 'आदर्श पत्रकार' पुरस्कार. (सन १९९४)

* भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ महाराष्ट्र शासनाचे 'सन्मान पत्र.' (सन १९९७)

* भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ सोलापूर ग्रामीण बँकेचे 'स्वातंत्र्यसैनिक - सन्मान पत्र.' (सन १९९७)

* भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ नवी दिल्ली येथील अखिल भारतीय स्वातंत्र्य संग्राम सेनानी समितीचे 'गौरव पत्र.' (सन २००१)

* सोलापूर येथील देशभक्त डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर स्मृती न्यासचा 'गजनफरकार हुतात्मा ए. कुर्बान हुसेन उत्कृष्ट पत्रकार' पुरस्कार. (सन २००२)

* भारतीय स्वातंत्र्य संग्राम, सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्र आणि करमाळा तालुक्यातील सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल करमाळा तालुका पत्रकार संघाचे 'मानपत्र.' (सन २००२)

* जामखेड येथील मानव सेवा ट्रस्टचा 'आदर्श मानव' पुरस्कार. (सन २००६)

* पत्रकारितेतील ६० वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीबद्दल नवी दिल्ली येथील गांधी फोरम या केंद्रीय स्तरावरील संघटनेचा 'पत्रमहर्षी स्व. रंगा वैद्य' स्मृती पुरस्कार. (सन २००७)

* भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ अकलूज ग्रामपंचायत आणि अकलूज येथील संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळाचे 'सन्मानचिन्ह.' (सन २००९)

* ग्रंथपाल दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त करमाळा नगर परिषदेचा 'आदर्श समाजसेवक' पुरस्कार. (सन २०१०)

* सोलापूर येथील लोकमंगल प्रतिष्ठान व सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेला 'लोकमंगल जीवन गौरव' पुरस्कार. (सन २०१२)

• शंकरराव येवलेंनी भूषविलेली पदे -

* पहिले ग्रंथपाल - ज्ञानेश्वर वाचन मंदिर, करमाळा.

* संस्थापक/अध्यक्ष - सोलापूर जिल्हा भूमिगत स्वातंत्र्यसैनिक संघटना.

* पुणे विभागीय सदस्य - पत्रकार अधिस्वीकृती समिती, महाराष्ट्र शासन.

* उपाध्यक्ष - सोलापूर जिल्हा पत्रकार संघ.

* अध्यक्ष - सोलापूर जिल्हा पत्रकार संघ.

* कार्याध्यक्ष - पुणे विभागीय पत्रकार प्रबोधन शिबीर.

* विशेष कार्यकारी दंडाधिकारी/ऑनररी मजिस्ट्रेट - महाराष्ट्र शासन.

* उपाध्यक्ष - अखिल भारतीय शाहीर परिषद, सोलापूर शाखा.

* अध्यक्ष - अन्याय निवारण समिती, करमाळा.

* विश्वस्त - श्री कमलाभवानी देवस्थान ट्रस्ट, करमाळा.

* अध्यक्ष - श्री कमलाभवानी देवस्थान ट्रस्ट, करमाळा.

* संस्थापक/व्हाईस चेअरमन - श्री कमलादेवी औद्योगिक सहकारी वसाहत, करमाळा.

* चेअरमन - श्री कमलादेवी औद्योगिक सहकारी वसाहत, करमाळा.

याशिवाय स्वातंत्र्यलढा इतिहास संशोधन व लेखन समिती, राष्ट्रीय एकात्मता समिती, भ्रष्टाचार निर्मुलन समिती, शहर दक्षता समिती या शासकीय समित्यांमध्ये सदस्य म्हणून देखील शंकरराव येवलेंनी काम केले होते.