दहशतवादी हल्ल्यात 2 जवान हुतात्मा भावपूर्ण श्रद्धांजली :राष्ट्र सेवा समूह

भावपूर्ण श्रद्धांजली अशी बातमी ऐकली कि मन विषण्ण होऊन जाते. एकीकडे या राजकारणी लोकांचा स्वार्थीपणा, काळापैसावाल्यांची तो वाचवण्यासाठीची धडपड, सत्ताधारी असो वा विरोधक.. सर्वांचा कोणत्या ना कोणत्या गोष्टींचे श्रेय लाटण्यासाठी थयथयाट, विविध पक्षांच्या प्रमुखांची देशाच्या भल्यापेक्षा माझ्या पार्टीचं भलं महत्वाचं.हि मानसिकता, देश बदलला पाहिजे पण मला त्रास नको हि आपल्यापैकी काहींची मानसिकता..सारे काही अशोभनीय. १९४७ पासून आजपर्यंत काहीही विशेष साध्य न होता आपल्या देशाने मात्र हजारो जवानांची आहुती दिली. नुकतेच तारुण्यात प्रवेश केलेले, नुकतेच संसाराची स्वप्न रंगवू लागलेले कितीतरी तरुण आपण गमावून बसलो. शहीद होतो एक सैनिक पण आयुष्यभर दुःख भोगतात त्यांची बायका-मुले. हे सर्व खूप चुकीचे आहे असे नाही वाटत